आमचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शाश्वत शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवणे आणि जमिनीची सुपीकता टिकवणे. आमच्या खतांचा वापर करून शेतकऱ्यांना उत्पादनात वाढ व चांगला आर्थिक लाभ होतो.
आम्ही शेतकऱ्यांना त्यांच्याच शेतावर सेंद्रिय खत तयार करण्यासाठी युनिट/प्रकल्प उभारण्यास मदत करतो, ज्यामुळे त्यांना एक चांगले उत्पन्न मिळते व त्याचवेळी रासायनिक खतांचा वापर कमी करून निसर्गसंवर्धनातही मोठा हातभार लागतो.
तसेच, आम्ही शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण करणारे विविध कंपाऊंड/उत्पादने पुरवतो, जे पाण्यातील हानिकारक जंतू व आजार निर्माण करणारे घटक कमी करतात. त्यामुळे पिकांचे संरक्षण होते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शेती उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
रेणुका अॅक्वा सॉईल केअर लिमिटेड —
शाश्वत शेतीसाठी सेंद्रिय आणि जलशुद्धीकरण उपाय!